⭕ *व्हाईस ऑफ मीडिया तर्फे उत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून अजय भामरेंचा सत्कार...!* ⭕



                 


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत  एस ठाकूर )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील      अमळनेर येथील देश पातळीवरील नंबर- १ ची ,ISO नामांकन संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या 'व्हाईस ऑफ मीडिया' ने  व्हाईस ऑफ मीडिया ,अमळनेर शाखेने विविध लोकोपयोगी, समाज उपयोगी उपक्रम राबविले होते. या कामाची पावती म्हणून, तसेच व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल  व्हाईस ऑफ मीडिया खान्देश विभाग "राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष अवार्ड -२०२३ "प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे काल दि. २६  फेब्रुवारी २०२४ रोजी  सायंकाळी मंत्रालयासमोरच्या यशवंतराव  चव्हाण सेंटर येथे पार पडला.लेखन मंच चे कार्य. संपादक तथा व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देवून युवा सेना अध्यक्ष तथा मा श्री आमदार आदित्यजी ठाकरे,मा.श्री आमदार रोहितजी पवार , संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष लढ्ढा हे होते.याप्रसंगी मा.श्री मंगलप्रभात लोढा, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री यशोमती ठाकूर, विचारवंत मा.श्री डॉ.नामदेव भोसले यासह  वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातील आणखी काही दिग्गज पत्रकारांना यावेळी गौरवण्यात आलं. पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज पत्रकारांच्या गौरवाच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली होती. यावेळी मा.संदीपजी काळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, व्हाईस ऑफ मीडिया, प्रदेशाध्यक्ष अनिल जी मस्के, महासचिव दिव्याताई भोसले तसेच देश/राज्य/जिल्हा/तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments