⭕ *मंगरूनाथ तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान...*⭕

 






 






       ( मंगरूनाथ मानद प्रतिनिधि: अनंता घुगे )  

             [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]      

⭕ अकोला / मंगरूनाथ (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार:- अकोला जिल्ह्य़ातील मंगरूनाथ येथील तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गणेश पाटील बोथे यांची मागणी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी रात्री तसेच सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने व गारपीट ने हजेरी लावली, या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतातील वेचनीस आलेला कापूस त्याचबरोबर तुर , हरभरा ,गहु, फळबाग, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अवकाळी पावसाने अनेक शिवारात ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. काही भागात पशुधन दगावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पावसाळ्यात ऐनवेळी दांडी मारल्या मुळे उभे पिके अपरिपक्व अवस्थेत होते. त्यामूळे शेतकरयांना लक्षणीय घट आली होती. आणि अनेक शेतक-यांचा तूर पिके हे परिपक्व आणि काढणीच्या अन्स्थेत येणारच होते. तेवढ्यात ऐनवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे व गारपिटीमुळे उभे तूर पिके जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेगा गळल्या आणि झाडे कोलांडून गेली. कुठे कापूस पाऊसाची हा वेचणर्णाला आला होता. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापूस ओला  झाला असून झाडावरच सरकीला कोंब येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे सर्वच गणित शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा व गारपटीचा फटका  बसला असून आता तोंडाशी आलेला खास हरभरा गव्हाचे व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून आता तात्काळ मदत जाहीर कराची अशी मागणी शेतकऱ्यांनकडून करण्यात येत आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी छत्रपती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे यांनी प्रशासनाकडे केली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे गणेश पाटील बोथे यांच्यासह संपूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments