⭕ *1992 मध्ये आयोध्या मध्ये जे कार सेवक गेले होते यांचेसत्कार...*⭕

 


 


     ( रिसोड तालुका प्रतिनिधी: अमर रासकर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड  मध्ये प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा निमित्त महाआरतीचे आयोजन व 1992 मध्ये कार सेवक म्हणून योगदान दिल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले श्री सिद्धेश्वर युवक संघटना रिसोड यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते 2 डिसेंबर 1992 रोजी रिसोड येथुन  विश्व हिंदू परिषदेचे तालुका सजोजक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वाशिम मार्गाने  आयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी कार सेवेसाठी रेल्वेने जात आसतानी रिसोड येथील कार सेवक यांना फैजाबाद येथे अटक करण्यात आले त्यानंतर त्यांनी त्यांची सुटका केली व गनिमी काव्याने पाच डिसेंबरला श्रीराम जन्मभूमीचे दुरूनच दर्शन यांनी घेतले व रात्रभर एका ठिकाणी मुक्काम केले व सहा डिसेंबर 1992 रोजी दुपारपासून मान्यवरांची भाषणे सुरू होती ती भाषणे ऐकंत असताना दुसऱ्या बाजूने धुळीचे लोट दिसत होते  धुळीचे  लोट दिसता क्षणी यांच्या लक्षात आले ज्या कामासाठी कारसेवक आले होते ते काम झाले  रिसोड शहरातील एकनाथ शिंदे विनायकराव पवार चंद्रकांत लवंडे महादेव माळेकर रामेश्वर डांगे रामकिसन रिठाड स्व चंद्रकांत शाडील्य सुहास पांडे वैशाली वालचाळे अर्चना कुलकर्णी संत्रे गोवर्धन येथील परमेश्वर वावगे रामभाऊ सरोदे श्रीराम गावंडे प्रभाकर काळबांडे मोरगव्हाणचे अशोक कोकाटे लोणीचे स्व कचरूलाल शर्मा यांनी वादग्रस्त वस्तूचे अवशेष दूर नेऊन टाकण्याचे काम करून श्रीराम चरणी आपली त्याबद्दल श्री सिद्धेश्वर युवक संघटना रिसोड यांच्यातर्फे शाल श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments