( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ डिसेंबर गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी मो. जफर मो. युसुफ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे . भाजपा मालेगाव शहर कार्यकारिणीच्या 25 डिसेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये डॉ. राजकुमार मुंदडा यांनी मो. जफर मो. युसुफ यांना नियुक्ती पत्र दिले आहे . सदर नियुक्ती पत्रात नमुद आहे की पक्षाच्या ध्येयधोरण तसेच अल्पसंख्खांक च्या विकासाकरिता पक्षाचे ध्येय धोरण व विचार अल्पसंख्खाक समाजाच्या सर्वसामान्य पर्यंत रुजवावे पक्ष वाढीस प्रयत्न करावेत. सोबतच भाजपाच्या सबका साथ सबका विकास या ध्येय धोरणाप्रमाणे पक्षाचे कार्य करुन पक्ष संघटन करावे . यावेळी भाजपा शहराध्यक्ष डाँ. राजकुमार मुंदडा, जेष्ठ नेते माजी सरपंच डाॅ .विवेक माने , अभिषेक मुंदडा, सुनिल शर्मा, कृष्णा जाजू , चेतन काबरा , शेख मुद्शीर , संतोष घुगे, पप्पु कुटे , सय्यद खाजा, किशोर महाकाळ, दिपक काटेकर , यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते .

