( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ डिसेंबर गुरुवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील झामी चौक येथे परिसरातील दाट भाग असून सकाळी कामगार लोक तेथून कामाची सुरुवात होत असते गवंडी काम सुतार काम महत्वाच्या हात मजुरी काम तेथून होत असते .परिसर असून बादरपुर रोड कडे जाणारे येणारे नागरिक व पाण्याच्या टाकी खाली अतिक्रम धारक रहात असून पाण्याची टाकी ही जीर्ण झाली आहे मात्र प्रशासकीय नोटीस देऊन सुद्धा पाऊल उचलले जात नाही काही नागरिक हे भीतीने राहत आहे .अधून मधून वरतून टाकीचे जीर्ण झालेले सलाई कंपाउंड भाग तुटत असतो मात्र काही नोटीसा देऊन अतिक्रम धारक राहत असतात संबंधित नोटीस देऊन टाकी पाडण्याचे प्रशासकीय योजना तयार आहे की नाही असे दिसून येत आहे पाण्याची टाकी ही 40 वर्षांपूर्वी बांधकाम झालेले आहे जवळील नागरिकांना भीतीचे वातावरण वाटत असून टाकी पाडण्यात यावी लवकरात लवकर अतिक्रम धारकांना पर्याय व्यवस्था करावी पाण्याची टाकी नवीन टाकी बांधण्यात यावी असे परिसरातील काही नागरिकांचे म्हणणे आहे


