( अमळनेर शहर प्रतिनिधी : उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव /अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधि) दि:२९ डिसेंबर शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत आहे. मंदिराला देशभरातील दात्यांमार्फत देणगीसह विविध भेटवस्तूही दिल्या जात आहेत. अलीकडेच गुजरात सुरत शहर लिंबायत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संगीता राजेंद्र पाटील यांच्याकडून अमळनेर शहरातील प्रसिध्द श्री मंगळग्रह मंदिरासाठी भाविकांना बसण्यासाठी दहा बाके भेट देण्यात आली आहेत..आमदार श्रीमती संगीता पाटील मूळच्या खान्देशातील असल्याने श्री मंगळग्रह मंदिराची ख्याती त्यांना माहिती आहे. एकदा त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली आहे.त्यावेळी त्यांना आलेली अनुभूती व मन:शांती मुळे त्या खूप प्रभावित झाल्या होत्या.मंदिर परिसरात फिरल्यानंतर मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी मंदिरासाठी काहीतरी दान देण्याची मनस्वी इच्छा प्रदर्शित केली होती. त्याच भावनेतून आमदार संगीता पाटील यांनी भाविकांसाठी बसण्याकरीता ही बाके उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शन, पूजा-अभिषेकासाठी येणा-या भाविकांची सोय झाली आहे..आमदार संगीता पाटील यांच्या या दातृत्व भावनेचे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व समस्त विश्वस्त मंडळ तसेच भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे...


