⭕ *कायदा मोडल्यास कडक कारवाई - ठाणेदार संजय चौधरी...नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मालेगांव पोलीस सज्ज...*⭕


( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव (लोकतक न्युज प्रतिनिधी) मालेगांव : - नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी मालेगांव पोलीस ठाणे सज्ज झाले आहेत. पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहेत. तर अमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत. नववर्षस्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्टी निमित्ताने बाहेर पडत असतात. या दरम्यान, काही वाहन चालक मद्य पिऊन वाहने चालवित असतात. तसेच दुचाकीवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात.याप्रकारामुळे अपघाताची भिती व्यक्त होत असते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मालेगांव पोलीस सज्ज झाले असून येत्या काही दिवसांत पोलिसांची विविध पथके शहरातील चौका-चौकांत तसेच नाक्यावर तैनात केली जाणार आहे. मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या चालकांवरही मोटार वाहन कायद्यातील तरतूदी नुसार कारवाई केली जाणार आहे. मालेगांव पोलिसांची पथके महत्त्वाचा चौकांमध्ये तैनात असतील. अशी माहिती मालेगांव स्टेशन चे ठाणेदार संजय चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments