( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधि ) दि:२९ डिसेंबर शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील वाशिम येथील भारतीय बौध्द महासभा वाशिम तालुका अंतर्गत त्रिरत्न बुद्ध विहार, पंचशील नगर वाशिम या ठिकाणी समता सैनिक दलाचे एकादिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर दि २८ डिसेंबर रोजी पार पडले. सादर शिबिरास एकूण ६७ महिला शिबिरार्थी नवीन सैनिकांनी सहभाग नोंदवला.भारतीय बौद्ध महासभा शाखा वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थजी भगत सर याच्या आदेशानुसार सादर समता सैनिक दल शिबिराचे उद्घाटन संस्कार विभाग प्रमुख हरिश्चंद्र पोफळे सर व कोषाध्यक्ष गोविदराव इंगळे यांनी केले तर कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्रा.मुकुंद वानखडे सर या प्रसंगी समाजसेवक राहुल बलखडे व गावकरी मंडळी उपस्तित होते, समता सैनिक दल प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून डिव्हिजन ऑफिसर आकाश इंगळे, मिलिंद खडसे, ज्योती धुरंधर, शिनी कंपनी कमांडर गणेश भगत यांची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली होती. वाशिम शहर शिबिराला ६७ महिला सैनिकांनी मोठ्या उत्साहात प्रशिक्षण घेतले शिबीर यशस्वी होण्यासाठी सैनिक कविता डोंगरदिवे, संदीप सरकटे व महिंद्रा कांबळे, आकाश पडघान, जितेश कांबळे,समता सैनिक दल शाखा पंचशील नगर यांनी घेतले.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी समता सैनिक दल प्रतिज्ञा घेऊन नविन महिला सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित आदरणीय पाहुण्यांनी मोलाचे मार्गदशन केले वाशिम जिल्ह्यात मुबंई हेड कॉटर वरून आलेल्या धम्मयान कॅलेंडर प्रकाशन करण्यात आले व कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

