( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: २६ डिसेंबर मंगळवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव स्थानिक मालेगाव शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीवर ट्रालित कचरा टाकण्यासाठी एकही कर्मचारी नव्हता.ते काम ड्रायव्हरलाच करावे लागत असे.परंतु नगर पंचायतने नवीन कर्मचारी नेमल्यामुळे महिलांचा त्रास कमी झाला आहे.याचे महीला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.या आगोदर कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीवर फक्त ड्रायव्हर हा एकच कर्मचारी असल्याने त्यालाच गाडी खाली उतरून महिला जवळील कचरा घेऊन तो गाडीच्या ट्रालित टाकण्याचे काम करावे लागत असे.त्यामुळे कचरा संकलन करण्यासाठी खुप वेळ लागत असे.तसेच अनेक वेळा कचरा ट्रालित टाकण्याचे काम महिलांनाच करावं लागतं असे.त्यामुळे गाडीत कचरा योग्य प्रकारे टाकला जात नसे.व तो कचरा रस्त्यावर पडून त्याचा लोकांना त्रास होत असे.परंतु आता एक जास्तीचा कर्मचारी नेमल्याने गाडीत व्यवस्थित कचरा टाकल्या जात आहे.तसेच महिलांचा त्रास कमी झाला आहे.सदर नगर पंचायतच्या या निर्णयाचे महिलांत समाधान व्यक्त केले जात आहे.
