( वाशिम मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील स्थानिक वाशिम येथे 25 डिसेंबर मनुस्मृति दहन दिनानिमित्त मनुच्या प्रतिमेचे आणि मनुस्मृतीच्या छायांकित प्रतीचे दहन करण्यात आले .यावेळी वाशीम येथील लहू - फुले- शाहू - आंबेडकर यांच्या विचारसरणीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती... सविस्तर वृत्त असे की , 25 डिसेंबर 1927 रोजी भारताचे महामानव भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे आपल्या अनुयानसह मनुस्मृतीचे दहन केले होते . ज्या मनुस्मृती मध्ये अस्पृश्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार नाही ,ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक नाकारला, ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला, ज्यामध्ये पशु, स्त्री आणि शूद्र म्हणहेच अस्पृश्य हे एक समान आहेत .त्यांना ढोल वाजविल्या सारखे दंडित केले पाहिजे .त्यांना जगण्याचा काहीच अधिकार नाही, अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नाही ,अस्पृश्यांना चांगले अन्न. खाण्याचा अधिकार नाही, अस्पृश्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार नाही अशा बऱ्याच अधिकार आणि हक्क यांच्यापासून वंचित ठेवण्याचा मंत्र आणि शिकवण या मनुस्मृती नावाच्या ग्रंथात आहे . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते. हा दिवस मनुस्मृति दहन दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो . यावेळी मनुस्मृतीचे आणि मनुच्या पुतळ्याचे दहन केले जाते. याचे औचित्य साधून वाशिम मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया ब्लू टायगर सेना शाखा वाशिम तर्फे करण्यात आले होते . यावेळी वाशिम येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपाळराव आटोळे गुरुजी, दौलतरावजी हिवराळे साहेब , अनिलजी कांबळे साहेब, जगदीश मानवतकर सर, राजकुमार पडघान साहेब ,वसंतराव हिवराळे साहेब ,माधव डोंगरदिवे सर ,आशिष कोकरे, गणेश चंद्रशेखर ,अक्षय इंगोले ,मुकेश ताजने , नितीन बांगर यांची उपस्थिती होती.यावेळी लहुजी वस्ताद साळवे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले,शाहु महाराज,अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या विजयी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेनेने केले.


