⭕ *राज्यस्तरीय मॅरेथॉन रनिंग स्पर्धेत 3 हजार विद्यार्थी पैकी चोरद येथील अभिषेक घुगेंचा 18 वा क्रमांक मिळविला...*⭕

 




    ( मंगरूपीर तालुका प्रतिनिधी:-अनंता घुगे )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ वाशिम / मंगरुळपीर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील      मंगरूपीर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमीत्ताने सोमवारी (ता.25) रोजी सकाळी 5 वाजुन 45 मिनीटांनी अमरावती येथील गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाप मॅरेथॉन   स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.वेळेवर या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंति निमित्ताने राज्यस्तरीय हाप मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन  प्रवीण पोटे , खा डॉ अनिल बोंडे  प्रताप अडसड , किरण पातूरकर , रवी खांडेकर , सौ निवेदिता चौधरी , सौ किरण महल्ले , जयंत डेहनकर , शिवराय कुलकर्णी , डॉ नितीन धांडे , रवी कोल्हे सह विविध क्षेत्रातिल मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवुन  सुरुवात झाली मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथील अभिषेक गजानन घुगे याने 18 वा क्रमांक रनिंग स्पर्धेत मिळविल्या बद्दल अभिषेक गजानन घुगेंचा चोरद जनुना (खुर्द)गट ग्राम पंचायत कार्यालयामध्ये  येथील सरपंचा निर्मलाताई भोंडणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी चोरद येथील मारोती घुगे, शाम गुठे, अनंता घुगे, सचिन घुगे, वैभव जावळे, दत्ता घुगे, विजय घुगे, विश्वनाथ घुगे, बंटि घुगे, गणेश गंगावणे, तसेच चोरद येथील मंडळी उपस्थित होते. अभिषेक घुगेंचे गावसह परिसरात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments