⭕ *दोन भरधाव टिप्परने एकास चिरडले...मृतक केनवड येथील...*⭕

 



( रिसोड तालुका प्रतिनिधी:- अमर रासकर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम  / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: २६ डिसेंबर मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील    रिसोड  येथील केनवड  खचाखच डांबर गिट्टी भरून जात असलेल्या भरघाव दोन टिप्परांनी एका 34 वर्षीय युवकाचा जीव घेतल्याची घटना आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11:45 वाजता रिसोड सरपखेड मार्गावर घडली. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव शेख राजिक शेख मोहम्मद वय 34 वर्ष असून तो रिसोड तालुक्यातील केनवड येथे निवासी आहे. याबाबत माहिती अशी की शेख राजीक शेख मोहम्मद हे रिसोड वरून आपले काम आटोपून आपले गाव केनवडला आपल्या दुचाकी क्र.एम एच 37 पि 4450 ने जात असताना सरपखेड जवळ गिट्टी डांबर घेऊन समोरून येत असलेल्या भरघाव टिप्पर क्रमांक एम एच 37 टी 2277 ने राजीक च्या दुचाकीला धडक देऊन त्याला खाली पाडले तर त्याच्या मागून येत असलेल्या टिप्पर क्रमांक एम एच 37 टी 2275 ने राजीक च्या शरीरावरून गाडी घालून अक्षरशः चिरडून टाकले. या घटनेमध्ये शेख राजीकचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तायडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठून दोन्ही टिप्परांना रिसोड येथील पोलीस स्टेशन मध्ये जमा करून मृतदेहावर रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले.मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. राजिक यांच्यावर राहत्या गावी केनवड येथे शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments