( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ डिसेंबर बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील तहसील कार्यालया जवळील श्री व्यंकटेश सेवा समिती द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रीडा सप्ताह उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून लक्ष्मण कांबळे तसेच देवानंद वैद्य हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर नारळ फोडून व फीत कापून प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सदर क्रीडा सप्ताह शाळेत चार दिवस चालणार आहे आणि विविध स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांचे शारीरिक कौशल्य कशा पद्धतीने दाखवता येतील असे खेळ या क्रीडा सप्ताहामध्ये घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या एकूणच शारीरिक कलागुणांना वाव देण्यासाठी अशा पद्धतीच्या किडा सप्ताह चे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले आहे असे प्रतिपादन लक्ष्मण कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. सदर क्रीडा सप्ताहाला शाळेचे मु.अ विठ्ठल भिसडे यांचे मार्गदर्शनात क्रीडाशिक्षक जिजीबा घुगे यांनी आयोजन केले आहे व सर्व शिक्षक वृंदांचे याला मोलाचे सहकार्य लाभले आहे.

