⭕ *मराठी पाट्या संदर्भात मनसेचे तहसीलदारांना निवेदन...*⭕

 


( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

 ⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० नोव्हेंबर गुरुवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथील राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर जिल्हाध्यक्ष मनीष  डांगे यांच्या मार्गदर्शनात मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे यांच्या नेतृत्वात  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मालेगाव शहरातील व्यापारी प्रतिष्ठान किरकोळ कपडा,हॉटेल, जनरल स्टोअर, हार्डवेअर, किराणा,पान टपरी,तसेच मालेगाव शहरातील नमूद प्रमाणे दुकाने इत्यादी नावे मराठी भाषेत लावण्यात यावे महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना सुधारणा नियम 2022 36 क्रमांक ज्या कलम 6 विषयाधीन ठळक अक्षरांमध्ये संस्कृत दर्शविणे  लावण्या करिता निवेदन देण्यात आले मा उच्च न्यायालय दिनांक 24/11/23 पर्यंत मुद्दत दिली होती ते मुदत संपली असून अजूनही मराठी नावे पाट्या लावलेल्या नाहीत त्या अनुषंगाने  मालेगाव शहरातील नगरपंचायत प्रशासनाने सूचना देण्यात याव्या असे मनसे कार्यकर्ते यांनी म्हटले. निवेदन देताना  तालुकाध्यक्ष गजानन पाटिल कुटे  तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,  तालुका उपाध्यक्ष विनोद  वानखेडे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड तालुका संघटक धनिराम बाजड, गणेश सरदार आदिची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments