( विदर्भ जानोरीमेळ प्रतिनिधी : देवराव परघर मोर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / जानोरीमेळ (लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि; २९ नोव्हेंबर बुधवार:- अकोला जिल्ह्य़ातील जानोरीमेळ तालुका येथील निंबा अंदुरा सर्कलमधील निंबा या गावांमध्ये निंबा ग्रामपंचायत च्या वतीने दरवर्षी संविधानाच्या दिवशी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात .... तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम मौलाना आझाद इत्यादी आदर्शांचे पूजन खालील मान्यवरांनी केले ...मागच्या वर्षी प्राध्यापक भोजने सर यांचे व्याख्यान यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी सुद्धा युवा व्याख्यानकार प्रबोधनकार आदित्य कुमार इंगळे यांचे संविधान या विषयावर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाला बाळापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या समवेत नायब तहसीलदार सुरडकर साहेब विस्तार अधिकारी पजई साहेब जिल्हा परिषद सदस्य पती संजय बावणे तसेच जिल्हा नियोजन समितीचे संघटक उमेश जाधव.् शिवसेनेचे उमेश उबाळे पंचायत समिती सदस्य सौ अर्चनाताई देशमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते जनसेवक अनिरुद्ध देशमुख निंबा गावचे सरपंच ज्योतीताई सोनोने उपसरपंच अंजली तायडे ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब तायडे ग्रामपंचायत सदस्य सचिन खोटे उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव फाटे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख निंबा गावचे पोलीस पाटील देशमुख तसेच निंबा ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन तायडे माजी सैनिक एमबी तायडे किशोर बोदडे निंबा गावचे तलाठी राऊत साहेब ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख धम्मपाल तायडे पत्रकार देवराव पर घर मोर पत्रकार लुक्मान शहा बुद्ध सिंग डाबेराव शांतशील तायडे इत्यादी उपस्थित होते..वरील सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायत निंबा च्या वतीने शाल श्रीफळ व हार देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर युवा व्याख्याते यांचे निंबा ग्रामपंचायत च्या वतीने सर्वानुमते त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर व्याख्यानाला त्यांच्या सुरुवात झाली व असे कार्यक्रम वारंवार करायला पाहिजेत यासाठी लोक स्वातंत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांनी व बाळापूर विधानसभा चे आमदार नितीन बापू देशमुख यांनी युवा व्याख्याते यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच वेगवेगळे प्रयोग करून आपल्या गावामध्ये प्रबोधन आणि नागरिकांमध्ये शक्यतो युवांमध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे व कुठलाही युवा पिढीतील युवक हा वाईट व्यसनाकडे वळला नाही पाहिजेत यासाठी पुढाकार या कार्यक्रमातून घेण्यात आला युवा प्रबोधनकार आदित्य ठाकरे यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते त्यांच्या भारदस्त आवाजाने सर्व निंबा नगरी ही दुमडून गेली होती व सर्व वातावरण अतिशय भावुक आणि संविधानमय त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने युवकांच्या अंगावर शहारे आणणारे असे त्यांचे प्रबोधन होते संविधानाचा कार्यक्रम व त्या कार्यक्रमांमध्ये लावलेला एक फोटो त्यामध्ये स्पष्ट दिसत होते की युवा प्रबोधनकार आदित्य ठाकरे यांच्या मते या देशाचा बाप संविधान एकटा देतोय आणि बाकी सगळे संविधान फक्त घेण्याचं काम करत आहे तर हे संविधान एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असून कुठल्याही व्यक्तीने त्यांना सपोर्ट केलेला नाही आहे त्यांनी दोन वर्ष 11 महिने 17 दिवसांमध्ये हे संविधान लिहून आपल्या या भारत देशाला 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारतीय पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला ते समर्पित केले म्हणून बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की संविधान सभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त अध्यक्ष होते आणि संविधान लिहिण्याची ताकद ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होती आणि त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून एका पावाच्या तुकड्यावर दिवस काढून आपल्या या भारताला संविधान लिहून ते संविधान आपल्या या भारत देशाला सुपूर्द केलं 152 देशांमध्ये आपल्या संविधानाचा फायदा या जगामध्ये होत आहेत तर माझे मत असे आहे की हे संविधान लिहिण्यासाठी कुणाचीही मदत त्यांना लागली नाही त्यांनी एकट्या च्या बळावर व त्यांच्या लेखणीच्या जोरावर आपल्या या भारत देशाला त्यांनी हे संविधान लिहून दिलेले आहे त्या संविधानाचा वापर जर चांगल्या प्रकारे झाला तरच या देशाचे चांगले होईल अन्यथा चुकीच्या लोकांच्या हातात हे गेल्यावर याचा चुकीच्या मार्गानेच वापर होणार आहे आणि ते आस्थागायत संपूर्ण खरे ठरत आहे हे संविधान चुकीच्या मार्गावर चालणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याच हातात हे पडलेला आहे आणि त्यांच्याच नुसार आपला भारत देश हा चालत आलेला आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन निंबा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य धम्मपाल तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील देशमुख यांनी केले


