⭕ शहरातील दुकानदारांनी इंग्रजीमध्ये फलक लावलेले आहेत.सदर दुकानदारांना नोटीस देऊन मराठीत फलक लावा..अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असे मनसे कार्यकर्ता द्वारा इशारा... न.प.मुख्खाधिकारी यांना निवेदन...⭕








 

(अमळनेर शहर मानद प्रतिनिधी दारा खास बातमी )     

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]   

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:-३० नोव्हेंबर गुरुवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील न.प. मुख्याधिकारी अमळनेर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर तालुका यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले..दि:25 नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देण्यात आले आहेत..तरी पण अमळनेर शहरातील काही दुकानदारांच्या फलकावर इंग्रजी अक्षरात नाव लिहिलेली होती त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी  न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले की 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत मराठी भाषेत फलक लावावे..असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असल्यास सुद्धा अमळनेर शहरातील दुकानांचे इंग्रजीमध्ये फलक लावलेले आहेत तरी आपण सदर दुकानदारांना नोटीस देऊन त्यांना मराठीत फलक लावा असे सांगावे..अन्यथा दुकानदार सर्वोच्च न्यायालयाचे आदेश चे पालन करत नाही म्हणून आपण त्या दुकानदारांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे)शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहर उपाध्यक्ष करण पाटील शहर सचिव संकेत पाटील शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष हर्षल पाटील आदित्य पगारे विद्यार्थी सेनेचे राहुल शेलार गट अध्यक्ष श्यामकांत बडगुजर संदीप पाटील योगेश पाटील दिनेश पवार प्रोमोद पाटील आकाश पाटील रुपेश पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते...*

Post a Comment

0 Comments