⭕ *पोलिस बांधवाणी जिल्ह्यातील गणपती बाप्पाला शांततेत विसर्जन करून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला केले विसर्जित...उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पुजारी, PSI शेटे,PSI अनिता इंगळे व ग्रा.पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद इंगळे त्यांच्या सहपत्नीसह गणपती बाप्पाला निरोप...*⭕

 

     (वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ आक्टोबर रविवार:- वाशिम जिल्ह्यातील दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी वाशीम येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला निरोप दिला.पोलीस बांधवांनी जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी याकरिता गणपती विसर्जनामध्ये आपले कर्तव्य बजावत ग्रामीण व शहरी भागातील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्तव्य बजावले. आणि जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता गणपती बाप्पाला शांततेने विसर्जित केली. तर आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी वाशीम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला देखील मोठ्या आनंदाने डीजेच्या गण्यावरती पोलीस बांधवांनी नृत्य करत आनंद विधीत करून गणपती बाप्पाला विसर्जित केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy sp) श्री. सुनिल पुजारी, PSI शेटे,PSI अनिता इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद इंगळे व त्यांच्या सहपत्नी इंगळे मॅडम यांच्यासह पोलीस कर्मचारी तथा होमगार्ड पोलीस बांधव यांनी गणपती बाप्पाची आरती घेऊनी "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणा देत गणपती बाप्पाला मोठ्या आनंदामध्ये विसर्जित केले. यावेळी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी पोलीस बांधव/महिला कर्मचारी व होमगार्ड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments