( अकोट मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
⭕ अकोट/अकोट ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ ऑक्टोबर रविवार:- अकोट शहर वाल्मिकी समाजाच्या नागरिकांचा वंचित.आघाडी मध्ये, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश...वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, वंचित चे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिपक भाऊ बोडखे यांच्या मार्गदर्शनामध्ये, व उपस्थितीमध्ये अकोट शहरातील राष्ट्रीय सफाई मजदूर युनियन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा. राधेश्यामजी मर्दाने, लक्ष्मीनारायण महातो,प्रदेश सचिव, राम हर फुल धामोनिया यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी अकोटचे विशाल आग्रे,दिनेश घोडेस्वार,जम्मू पटेल, अक्षय तेलगोटे यांच्या सह वंचित चे पदाधिकारी उपस्थित होते.

