( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ ऑक्टोबर मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर तालुका कुस्तीगीर संघटना व जळगाव जिल्हा संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने..अमळनेर कुषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख व अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गादी आखाड्याचे पूजन बाजार समिती सभापती अशोक पाटील व माती आखाड्याचे पूजन मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे अक्षय अग्रवाल ,तालुका क्रीडा अधिकारी ,संचालक समाधान धनगर , विजय पाटील , तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ हजर होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते विजयी पैलवानांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला..जळगाव जिल्हा कुस्तीगिर संघटना व अमळनेर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांचे उदघाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते झाले...
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे- माती गट मोहसीन मुल्ला (चाळीसगाव ६१ किलो गट), संदीप कंखरे (धरणगाव ५७ कि) , राज वाकोडे (भडगाव ६५ कि), अनिल पवार (चाळीसगाव ७० कि), समाधान पाटील (पारोळा ७४ कि), धनंजय सरोदे (चाळीसगाव ७९ कि), समाधान पाटील ( एरंडोल ८६ कि), अजिंक्य माळी ( चाळीसगाव ९२ कि), प्रवीण बच्छाव (चाळीसगाव ९७ कि), गोपाल जानी (चाळीसगाव १२५ कि) गादी गट- यशवन्त बोरसे (जळगाव ५७ कि), यश अरुण मराठे (जळगाव ६१ कि) ,सुमित पाटील (एरंडोल ६५ कि) ,कल्पेश पाटील (भडगाव ७० कि), वैभव सोनवणे (जामनेर ७४ कि) ,शेख नासिर याकूब ( सायगाव ७९ कि), योगेश बैरागी (चाळीसगाव ८६ कि) ,हितेश पाटील (पाचोरा ९२ कि) , राजेंद्र भोई (पाचोरा ९७ कि), भावेश पाटील (चाळीसगाव १२५ कि)
स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून विलास भोसले , विजय मराठे , पी पी पाटील , दिलीप संघेले , गुलाब चव्हाण ,मंगलसिंग पवार , एस के पाटील ,प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक समिती सुनील देशमुख संजय महाजन , संजय पाटील , अजय देशमुख , भानुदास आरके , तसेच बाळू पाटील ,संजय पाटील , शब्बीर पैलवान , संजय भिला पाटील , प्रताप शिंपी , मुख्तार खाटीक रावसाहेब पाटील ,भरत पवार , प्रवीण पाटील ,हरीश शेळके ,प्रशांत पाटील ,विशाल महाजन ,आप्पा पाटील ,हसन पैलवान यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन एस पी वाघ यांनी तर आभार सुनील देशमुख यांनी मानले.
