( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ नंन्दुरबार / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२३ ऑक्टोबर सोमवार:-अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी : नंदुरबार जिल्ह्यामधील नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने १०९ कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजनाचे आयोजन. नन्दुरबार मोठा मारुती मंदिर सभागृहात करण्यात आले होते.
पुजनाची सुरुवात अंबिका मातेचा महाआरतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, खासदार डॉ हिनाताई गावित, आरोग्य अधिकारी विशाल कांबळी, प्रा युवराज भामरे,उद्योगपती सुरेश अग्रवाल, ऍड अनिल लोंढा, ऍड अविनाश पाटील, अशोक चौधरी, डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते. नगरपालिका शाळेतील १०० आणि मतिमंद शाळेतील ९ असे १०९ कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि जैन, अग्रवाल, सोनार समाज महिला मंडळ व भामरे ऍकेडमीचा भगिनी यांचा हस्ते करण्यात आले, कन्यापूजन सर्व कन्यांचे पाद्यपूजा करून करण्यात आले. यानंतर सर्व १०९ कन्यांना नवीन कपडे, वाटरबॅग आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकातुन हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीत कन्यापूजन करण्याचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात एकाचवेळी १०९ कन्यापूजन करून मातृशक्तीचा सन्मान केल्याबद्दल हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांचे कौतुक करून भविष्यात असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. खासदार डॉ हिनाताई गावित यांनी मनोगत व्यक करतांना सांगितले की, नवरात्रीत जसे आपधधणडड मातृशक्तीचा सन्मान करत आहोत त्याचप्रमाणे ३६५ दिवस 'बेटी बचाओ बेटी पढाओ' साठी प्रयत्न करावा लागेल. आपल्या जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर घटत असून प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. सुत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी व्यक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणिलताईआरोग्यधामयांचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.




