⭕ *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी होत असलेल्या टाळाटाळ बाबत...समता सैनिक दल भडगांव तालुक्याच्या वतीने सर्व संबंधित शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले...*⭕

 





(भडगाव ता.मानद प्रतिनिधि दारा खास बातमी )  

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕ जळगाव / भडगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२१ ऑक्टोबर शनिवार:- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात मौजे पिचर्डे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नियोजित जागा नावे  लावण्यासाठी टाळाटाळ होत आसल्याचे कळताच समता सैनिक दलाचे तालुका प्रचारक विजय मोरे यांनी सदर घटनेची माहिती घेवून.मा.जिल्हा प्रचारक  किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन घेऊन घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले!!! सोबत समता सैनिक दलाचे वाल्मीक मोरे, सागर मोरे,राकेश मोरे आदि.उपस्थित होते.

   सदर घटनेची माहिती अशी की, मौजे पिचर्डे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जागा नावे लावण्याबाबत स्थानिक लोकांनी  विनंती अर्ज ग्रामपंचायत पिचर्डे यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार मासिक सभा दि. ३१/०३/२०२३ अन्वये सदर जागा नावे लावण्याबाबत मा. गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती भडगाव यांच्याकडे योग्य त्या मार्गदर्शनासाठी पत्र व्यवहार करणे बाबत ठराव समंत झाला आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत पिचर्डे यांनी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे सदर प्रकरणांसदर्भात दि. ०३/०४/२०२३ रोजी पत्र व्यवहार करून मार्गदर्शन  मागितले आहे. परंतु आज पावेतो संबंधित कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही .

  सदर प्रकरणांस आज सहा महिने उलटले असून आज पर्यंत कुठलीही हालचाल झालेली नाही.यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून सदर प्रकरणाची गांभिर्यपूर्वक दखल घेऊन सदर जागा नमूना क्रमांक ०८ मध्ये नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.15 दिवसांच्या आत सदर स्मारकाची जागे संदर्भाची कारवाई न झाल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन भडगाव येथील मा.गटविकास अधिकारी,मा.तहसीलदार, मा.पोलिस निरीक्षक,मा.ग्रामसेवक ( ग्रामपंचायत ) यांना देण्यात आले आहे*...आपला वाल्मीक मोरे प्रसिद्धी प्रमुख :समता सैनिक दल भडगाव तालुका

Post a Comment

0 Comments