(अमरावती जि.मानद प्रतिनिधी दारा खास बातमी)
[अमरावती:लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ अमरावती/अमरावती:-दि:०१ सप्टेंबर शुक्रवार:-अमरावती जिल्ह्य़ातील आज रोज सकाळी नांदगाव पेठ टोल नाक्यावर सावरडी येथील प्रवीण तायडे याचा अपघात झाला त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये ऍडमिट करण्यात आले डॉक्टर कुंडे सर यांनी त्या रुग्णाला सिटीस्कॅन सांगितले रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर हे रुग्णाला पाहण्यासाठी रुग्णालय दाखल झाले तेव्हा सिटी सिटीस्कॅन का झाला नाही असे विचारले असता आपत्कालीन विभागामधील कर्मचारी आशिष माटे हा तिथे नसताना विचारपूस केली की आपत्कालीन विभागामधील अपघाताच्या पेशंटला सिटीस्कॅनला तात्काळ न्यायचे आहे तो कर्मचारी तिथे हजर नव्हता त्याची शोधा शोध केली असता आशिष माटे हा वार्ड बॉय साफसफाई करताना आढळला त्याला विचारणा केली असता तो काहीच बोलत नव्हता तेव्हा मी त्याला म्हटले सिटीस्कॅन पेशंट आहे त्याला तात्काळ घेऊन जा तेव्हा तो ठेकेदाराच्या सुपरवायझरच्या दबावाखाली काम करत असल्याचे आढळून आले जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढत आहे इथले आमदार खासदार फक्त स्टंटबाजी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जातात आपली नौटंकी करतात नौटंकी संपली की दुसऱ्या दिवशी रुग्ण मरेपर्यंत त्यांना कोणी पाहायला येत नाही आठ आमदार दोन खासदार असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडून दिलेला आहे स्टंटबाजी करण्यात आलेल्या आमदार खासदारांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जमणार नाही कारण प्रवीण तायडे म्हणून यातना भोगत असताना त्याला सिटीस्कॅनला नेणे गरजेचे होते मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर सुपरवायझर हे लोक रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे अशा सुपरवायझरला तात्काळ हटवावे कारण हे सुपरवायझर मस्तावल्यावस्थेत काम करत असल्याचे आज समोर आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्याला याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात येणार आहे
आपला
शहराध्यक्ष
रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे
वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती



