⭕ *लातुर:स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्येष्ठ पाल्यास विशेष निकषांतर्गत मानधन देऊन सन्मानित करण्याची वारसदार संघटनेची मागणी...*⭕

 

(लातुर जिल्हा मानद प्रतिनिधी द्दारा खास बातमी) 

           [लोकतक समाचार न्युज नेटवर्क] 

⭕लातुर/निलंगा: दि:०१ सप्टेंबर शुक्रवार:- लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथील स्वातंत्र्य सैनिकाचा ज्येष्ठ पाल्य मुलगा किंवा मुलगी जर त्यांचे वय सत्तर वर्षाचे आहे किंवा जे सरकारी नोकरीत नव्हते ज्यांनी दोन अपत्यावर कुटुंब नियोजन केले आहे किंवा बेटी बचाव बेटी पढाव या न्यायाने तीन पेक्षा अधिक मुलीस जन्म देऊन त्यांनी त्यांना त्यांच्या पायावर उभे केले अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या ज्येष्ठ पाल्यास स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देत त्यांना विशेष मानधनाने सन्मानित करावे अशा आशयाची मागणी स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या थोरवीरांनी आपले योगदान दिले अशा थोर क्रांतिकारकांची  कदर राज्य सरकारने घेतली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे वारसदार सरकारचे ऋणी आहोत.स्वातंत्र्यसैनिकावर आधारून अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालत होता त्यांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबावर त्यांच्या चरितार्थाचा  गंभीर प्रश्न उभारला आहे सध्या राज्यात अनेक योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना उपजीविकेसाठी दरमहा मानधन देण्यात येत आहे त्याच धर्तीवर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांची उपेक्षा न करता मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या ज्येष्ठ पडल्यास विशेष निकषांतर्गत मानधन लागू करण्याच्या विनंतीसह प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा फोटो लावण्यात यावा अशा आशयाची मागणी जेष्ठ पत्रकार शाम मूळज कर यांनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

Post a Comment

0 Comments