(मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि:अंनता घुगे)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ वाशिम/मंगरुळपीर दि:०१ सप्टेंबर शुक्रवार:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलु /हिरंगी येथे मंगरुळपीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षांचा सन्मान सत्कार सोहळा प्रसंगी गावच्या विकासात्मिक दृष्टीने प्रत्येक गावातील आपसातील वाद विवाद तंटे सर्वांनी एकत्रित येऊन तंटामुक्ती अध्यक्षांनी जातीच्या किंवा नातलगाच्या बाजुने उभे न राहता न्यायाच्या बाजुने उभे राहून गावातील भांडने तांट्टे सोडवावीत असे आव्हान गुरुवार ता.31 रोजी तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांनी माळशेलु येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले. यावेळी माळशेलु, हिरंगी येथील नवनिर्वाचित अविरोध निवड झालेले तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव सावके पाटील आणि माळशेलु येथील देविदास जाधव तसेंच नुकत्याच शासकीय नियमनुसार पदी नियुक्ती झालेल्या माळशेलु येथील कोतवाल सौ प्रिया ताई देशमुख यांचा सत्कार तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन करण्यात आला.
यावेळी पं. स. सदस्य विलासराव लांभाडे सरपंच ज्ञानेश्वर देशमुख नांदखेडा येथील सरपंच सचिन जायभाये डॉ. सुनील राऊत, प्रल्हाद राठोड, कैलास राठोड,श्रीराम जावळे, उपसरपंच पंडितराव जाधव, सर्कल प्रमुख गजानन सुर्वे, उप सर्कल प्रमुख संजय तिरके, दिलिप उपाध्ये,वनोजा येथील ग्रामपंचायत सदस्य मोहन पानभरे, मारोती इंगोले, दिलिप राऊत, गोवर्धन पाटील, नागी येथील गणेश राऊत ,बाळकृष्ण रोकडे,नादाखेडा येथील सरपंच चंद्रशेखर जायभाये,लाठी येथील भुषण सुर्वे, गोपाल पाटील सुर्वे, चिखली येथील सचिन पाटील राऊत, गजानन चौधरी, माळशेलु ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, राहुल जाधव, सतीश धामंदे, विष्णु भोंडणे,बबन बेलखाडे, शेषराव धोंडगे, समाधान वैरागड, गजानन तायडे, अनिल चव्हाण, प्रकाश जावळे, कैलास गुजर, विनोद बरडे ,सुखदेव गव्हाणे ,अर्जुन जाधव, सर्वं शाखा प्रमुख हिरंगी,लाठी,चिखली, वनोजा,नांदखेडा,नागी, चोरद,समस्त शिवसेना पदाधिकारी तथा गावाकरी मंडळीबहू संख्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ सुनील पाटिल राऊत,यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच ज्ञानेश्वर कदम यांनी केले आहे.

