(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
[वाशिम:लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ वाशिम/मालेगाव:-दि:०१ सप्टेंबर शुक्रवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरांमध्ये श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिर निर्माण होत आहे.सदर मंदिराचा भुमिपुजन सोहळा शुक्रवार दि ८ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे. संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचे भव्यदिव्य मंदिर मालेगाव येथे निर्माणाधिन असून या मंदिराचा भूमिपूजन सोहळा दि ८ रोजी संपन्न होत आहे.सदर भूमिपूजन सोहळा हा पुजारी शशिकांत देव महाराज, वाशिम यांच्या पौरोहित्या खाली पार पडत असून शिरपूर येथील प पू महेश गिरी बाबा, जानगीर महाराज संस्थान शिरपूर ,प पू शांती पुरी बाबा सिद्धेश्वर संस्थान येवता,ह.भ.प. संजय बाबा पाचपोर ,विदर्भ रत्न यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती ह.भ.प रमेश महाराज वाढनकर,ह.भ.प केशव बाबा नागठाणा,अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री विश्वकर्मा प्रभू संस्थान मूळ देवस्थान शिरपूर,ह.भ.प गणेश महाराज हुंबाड महागाव,ह.भ.प विजय महाराज शास्त्री अमानी तथा सोनार समाजातील मान्यवर मंडळी यांची असणार आहे.
भूमिपूजन सोहळा नागरदास रोड, हॅपी फेसेस शाळेजवळ, संत नरहरी महाराज नगर, मालेगाव येथे होईल.मंदिराच्या भूमिपूजन सोहळा पूजे नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल.तरी समाज बांधव तथा भगिनींनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व सोनार समाज बांधव मालेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
