[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ सप्टेंबर मंगळवार:-मालेगांव दि.२३ सप्टेंबर रोजी ग्रामीण रूग्णालय मालेगाव येथे आरोग्य मेळाव्याला उपस्थित राहिलेले तज्ञ डॉक्टरांची टीम.सदरील मेळाव्या मध्ये रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली येथील ग्रामीण रुग्णालयात शासन स्तरावरुन जनतेच्या सक्षम आरोग्य सेवेसाठी राबविल्या जाणाऱ्या आयुष्यमान भव आरोग्य तपासणी शिबिरास २३ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असुन आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे यांनी केले आहे दि.२३ सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव या मोफत तपासणीची सुरुवात डॉ.कावरखे सिविल सर्जन सर वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराच आयोजन करन्यात आले असून ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांची ही आरोग्य तपासणी करन्यात आली असुन यावेळी आरोग्य मेळाव्याला उपस्थित डॉ.देवळे,डॉ.सुनील तरोडे,डॉ.हेंबाडे,डॉ. पुरुषोत्तम देवळे,डॉ.आकाश मोरे,डॉ.स्मीता,डॉ.सुनीता कोरे,डॉ.भाग्यवंत आयुषटिम व ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.वाहुळे सर ता.वैद्यकीय अधिकारी डॉ.बोरसे सर होते तसेच दि.२५/९/२०२३ रोजी नगर पंचायत मालेगांव येथे सफाई कर्मचारी तसेच अधिकारि व कर्मचारी यांची मधुमेह,रक्तदाब,कर्करोग मध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग,तसेच गर्भाशयाचा कर्करोग,तपासणी करण्यात आली मालेगांव ग्रामीण रूग्णालय येथील डॉ.सुहास वाहुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिन सानप तसेच श्री.सुनील तोंडे सर औषध निर्माता,श्री प्रवीण गोरे सर NCD समुपदेशक,श्री प्रवीण करवते,श्रीमती शुभांगी दांदळे सिस्टर,श्री.भूषण वाझुळकर श्री विशाल जवंजाळ,ई.कर्मचारी वर्ग यांनी नगरपंचायत येथील अधिकारी,कर्मचारी,तसेच सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी केली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेंतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार असुन यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब,मधुमेह,तोंडाचा,
गर्भपिशवी,मुखाचा,स्तनाचा कर्करोग,तसेच सिकल सेल आजार या दुर्धर आजारांचा समावेश आहे त्याबरोबरच ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची जन्मतः व्यंग व इतर दुर्धर आजारांसाठी तपासणी सुरु आहे या शिबिरात पात्र लाभाथ्यार्ची नोंदणी करून आयुष्मान कार्डचे वितरण तसेच आभा कार्ड करण्यात येणार आहे या माध्यमातून आरोग्यविषयक सेवा सुविधांची जनजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावनी ३२ सामान्य आजाराची तपासणी व उपचार करण्यात येणार असुन आवश्यकता असल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर तसेच नोंदणीकृत खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


