( अमळनेर शहर प्रतिनिधी:उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० सप्टेंबर शनिवार:- जळगाव येथील झालेल्या संमेलनात व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रव्यापी संघटने च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांची निवड करण्यात आली आहे . जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्ती चे पत्र त्यांना जळगाव येथे रविवारी झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या ऊर्दू विंग च्याराष्ट्रीय सम्मेलनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.महाले गेल्या ३५ वर्षां पासून पत्रकारीतेत कार्य करीत असून त्यांनी केलेल्या उत्तम पत्रकारीतेमुळे हा सन्मान त्यांना समारंभपूर्वक देण्यात आला आहे. त्यांची संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे, उदय पाटील,प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील,
मुफ्ती हारून नदवी, सुरेश उज्जैनवाल, विनोद बोरे, करीम सालार, आदींनी कार्यक्रमात अभिनंदन केले.
