( अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:२७ सप्टेंबर बुधवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गांधलीपुरा भागात ग्रंथालय चळवळ चालविणाऱ्या रियाज भाई यांच्या ग्रंथालयास ग्रंथ प्रेमी भाऊसाहेब देशमुख यांनी संमेलन संदर्भ ग्रंथ भेट देऊन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्यात.सदरच्या ग्रंथालय आणि वाचनालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाचनालयाची सोय करून देण्यात आली असून परिसरातील मुले मुली स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.अभ्यासाच वातावरण तयार करून संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित केले आहे.ग्रंथ भेट प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रियाज शेख, प्रा अशोक पवार,गौतम मोरे, संदीप घोरपडे, के डी पाटील, भागवत गुरुजी, रज्जाक शेख, अष्पाक शेख, मुन्ना शेख, सफदर दादा,मुश्ताक बागवान, एस एम अण्णा पाटील, इ मान्यवर उपस्थित होते.
