⭕ *सेवा सहकारी सोसायट्या मध्ये लोकसहभाग वाढविणे गरजेचे.:डॉ.संतोष कोरपे...*⭕


 ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी :अजय गायकवाड )

        [लोकतक समाचार न्युज नेटवर्क]

⭕ वाशिम/ मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ सप्टेंबर बुधवार:- मालेगांव आपल्या पुर्वजांनी शेतकरी,शेतमजुर,तसेच सर्वसामान्यांच्या उत्पादना साठी सहकाराला आत्मसात केले सहकार चळवळीच्या माध्यमातून बँका,पतपेठया, सेवा सहकारी सोसायटीच्या रुपाने भांडवली व्यवस्था उभी केली या व्यवस्थेतच शेतकरी वर्गाची प्रगती होत आहे त्यामुळे सहकारी भांडवली व्यवस्थेला आणखी बळकटी आणण्यासाठी सोसायट्या अधिक सक्षम बनविण्या करीता लोकसहभाग गरजेचा आहे आणि तो व्यापक स्वरूपात असायला हवा असे प्रतिपादन दि अकोला व वाशिम मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ संतोषकुमार कोरपे यांनी मालेगाव येथे दि २६ रोजी प्रतिपादन केले ते कै.डॉ. आण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मालेगांव सेवा सहकारी सोसायट्याच्या पंचकमिटी मेळाव्यात बोलत होते सेवा सहकारी सोसायट्यांचे कामकाज सुव्यवस्थित तसेच चांगले चालण्यासाठी प्रत्येक गावात सेवा सहकारी सोसायटीचे कार्यालय असावे यासाठी अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन सोसायटीला १ लाख (एक लाख) अनुदान स्वरुपात व ४ लाख कर्ज असल्या दराने देण्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी जाहिर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी केले सुत्र संचलन बँकेचे उपमुख्याधिकारी प्रशांत ठाकरे यांनी केले,कार्यक्रमात बँकेचे संचालक दिलीपराव जाधव,कृषि उत्पन्न बजार समिती मालेगांव चे सभापती गणेश उंडाळ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, माजी संचालक बबनराव गवळी,सुरेश दहात्रे, जगदिशभाऊ बळी,बबनराव चोपडे,अयुब भाई,प्रदिप पाटील कुटे,वैजनाथ आप्पा गौंडाळ, डॉ जगदिशराव घुगे, तसेच सेवा सहकारी सोसायटी चे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशाल काटेकर मार्केटिंग अधिकारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments