⭕ *शेतात जनावर शिरल्याने मारहाण...एक जण गंभीर जखमी*...⭕

 



   ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ सप्टेंबर बुधवार:-मालेगांव तालुक्यातील सुदी गावात सोमवारी सायंकाळी 5 वाजता शेतात जनावर शिरल्यामूळे चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करून तिच्या पतीला काठ्यांनी मारहाण केली. महिला आणि तिच्या आत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा काठीने मारहाण करण्यात आली त्यांच्या डोक्याला, महिलेच्या पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी सुदी गावातील राजकुमारी विलास चव्हाण वय 30 वर्षे यांनी वैभव रंजित भोयर, गोपाळ बळीराम भोयर, अविनाश दिलीप भोयर, अभिषेक संतोष भोयर सर्व रा. सुदी यांच्याविरुद्ध 26 सप्टेंबर रोजी भल्या पहाटे 2 दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमारी चव्हाण यांच्या गायीचे वासरू.त्याचे दावे सुटून  आरोपीच्या शेतात गेले. यामुळे चारही आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत महिलेचा पती विलास चव्हाण यांच्या डोक्यात काठीने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी महिला व तिच्या आत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्या डोक्यावर, हातावर व पायावर काठीने वार करून त्यांनाही जखमी केले. तक्रारदार महिलेचे पती विलास चव्हाण यांना मालेगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना प्रथम वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने रात्री उशिरा त्यांना अकोल्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. राजकुमारी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 436 / 2023 नोंदवून  भादंवि कलम 324, 504, 34 अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार दत्तात्रय आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे व पोलीस कांस्टेबल विजय मोरे हे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी 26  सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुदी गावात गेले असल्याची माहिती मिळाली आहे...

Post a Comment

0 Comments