( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ सप्टेंबर मंगळवार:- मालेगाव येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ नेहमी सामाजिक कामामध्ये अग्रेसर असून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता व या पुस्तकांचे वाटप गणवेश वाटप करीत असतात तसेच ही परंपरा कायम ठेवून विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मालेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मालेगाव येथे विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळा कडून श्री गणेश उत्सवात शैक्षणिक मदत स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले यावेळी मालेगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार आव्हाळे यांनी विघ्नहर्ता गणेश मंडळांचीशब्दसुमनाने स्तुती केली तसेच ठाणेदार आव्हाळे ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खिल्लारे सर व शिक्षक राऊत सर , यांच्या हस्ते स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले यावेळी विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


