( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ सप्टेंबर मंगळवार:-मालेगाव ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा येथील ग्रामपंचायतने दि 11/9/2023 रोजी ग्रामसभा घेतली त्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष व ग्राम रोजगार सेवक यांची बेकायदेशीर झालेली निवड रद्द करुन सरपंच व सचिवावर योग्य कार्यवाही या मागणी साठी आकाश घुगे यांनी गट विकास अधिकारी मालेगांव यांना निवेदन दिले होते परंतु निवेदनाची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने आकाश घुगे यांनी 20/9/2023 रोजी सकाळी 11 वाजता पासुन आपले उपोषण ब्राम्हणवाडा येथील स्व गोपीनाथरावजी मुंडे सभागृह येथे सुरू केले असून त्यांच्या उपोषणास सर्व राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांनी भेटा दिल्या तसेच गावातील बर्याच ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणास पाठींबा दर्शिवला आसताना प्रशासनाच्या वतीने आकाश घुगे यांचे उपोषण माघे घेण्यासाठी कुठलीही मध्यस्तिती किंवा पर्याय निवडला नसल्याने आज आकाश घुगे यांची तब्बेत खालवली आसून समधित प्रशासनाच्या या उद्दटपणा निषेध केला आहे.



