(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजुर सौर उर्जेचे लाईट लावताना दुजाभाव करण्यात आला. त्यामुळे दलित वस्ती अंधारात असल्याचा आरोप सागर जगताप यांनी मुख्यधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाव्दारे केला आहे.सदर निवेदनानुसार, शहरात शहरातील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सौर ऊर्जेचे लाईट मंजुर असल्याने त्याच वस्तीतील लाईट लावणे होते. परंतु नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदार व राजकीय दबावातून सदर पथदिवे दलित वस्तीत न लावता अन्यत्र लावले. शिवाय योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार देखील करण्यात आला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागात अनुसूचित जातीची ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी दलित वस्तीचे काम करताना त्या भागात लोकसंख्या जास्त आहे. त्या भागात प्राधान्य उतरत्या क्रमाने कामे प्रस्तावित करण्याचे शासन परिपत्रकात नमूद आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 08, 13 व 03 हे दलित समाज बहुल प्रभाग असून या प्रभागामध्ये दलित वस्ती अंतर्गत सौर ऊर्जा चे पथदिवे लावणे आवश्यक होते. परंतु तसे न करता सदर निधी प्रभाग 17 मध्ये पळून सदर निधीचा दुरुपयोग करीत मनमानी पद्धतीने सौर ऊर्जेचे पथदिवे लावून दलित वस्ती प्रभागातील क्र. ३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व गौतम बुद्ध यांचे ३ जागेवर पुतळे आहेत. दलित स्मशान भूमीबांधवांवर अन्याय केला.तरीसुद्धा मागासवर्गीय वस्त्या व त्यांचे ठिकाणे सर्व वगळुन सर्वसाधारण वार्ड असलेल्या परीसरात ना.ना. मुंदडा विद्यालयाच्या रस्त्यावर सौरउर्जा हायमस्ट लाईट लावण्यात आलेले आहेत हा वार्ड १७ हा सर्वसाधारण साठी होता हा मागासवगीय लोकांवर अन्याय करण्यात आला आहे. शिवाय संबंधित प्रभागात कंटकदाराने अत्यंत गुप्तपणे हे निविदा देण्याचे काम करण्यात आले असून नियमबाह्य पध्दतीने ही प्रक्रिया घेण्यात आली. या योजनेच्या कामात झालेला गैरप्रकार संतापजनक असून अनुसूचित जातीच्या बांधवावर अन्याय करणारा आहे.
अन्यथा दलित समाजा तर्फे रस्त्यावर उतरुन या प्रकाराचा निषेध मोर्चा काढण्यात येईल असे सागर जगताप यांनी म्हटले आहे.
