(वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील बहीण भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा,नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. मात्र ३०ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असले तरी भद्राकाळ पाहिल्यास ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगितले जात असून. आपआपल्या श्रद्धेनुसार आज गुरुवारला खऱ्या अर्थानं सकाळपासून रक्षाबंधन हा सण साजरा होत आहे पांगरी नवघरे येथील स्वरा नावाची चिमुकली आपल्या भावाचे औक्षण करत राखी बांधून भावांना असाच पाठीराखा राहारे दादा असे सांगत रक्षाबंधन उत्सव साजरा करत होते.

