(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ वाशिम जिल्ह्यातील मालेगांव यथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी डोंगरकीन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनीअटक केली आहे.मालेगांव ठाण्याच्या हद्दीतील डोंगरकीन्ही येथिल महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ता 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून त्यांच्या घराशेजारील गजानन निंबाजी गवई ( वय 39 वर्षे ) हा शेजारी राहणारा इसम घरात शिरला व आतून दार बंद करून फिर्यादी महिलेच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानी नुसार जेव्हा फिर्यादी दुपारी 3.00 वाजता घरी परतली तेव्हा तिची अल्पवयीन मुलगी खुप घाबरलेली दिसली. आईला आलेली पाहताच ती रडू लागली, तिला रडताना पाहून फिर्यादीने शेजारी राहणाऱ्या आपल्या जाऊला बोलाऊन घेतले त्यानंतर जेव्हा दोघींनी मिळून मुलीला विचारपूस केली तेव्हा मुलीने सांगितलेली हकीकत ऐकताच दोघी जावा हादरून गेल्या, महिलेने त्वरित मालेगांव गाठून फिर्याद दाखल केल्यानंतर मालेगांव ठाण्यात गजानन निंबाजी गवई आरोपीच्या विरोधात गुन्हा क्रमांक 412 / 2023 नोंदवून भादंवि च्या 452, 354 (अ), 376, 506 सोबत बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याच्या 4, 6, व 8 कलमान्वये गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. वरील प्रकरणाची चौकशी ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका नारखेडे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीला 31 ऑगस्ट च्या भल्या पहाटे 1.45 वाजता अटक केली आहे.
