⭕ *वाशिम:सुगरण पक्षाच्या घरट्याचे संवर्धन करण्याचे आव्हान...*⭕


(मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि:-अनंता घुगे)

(वाशिम:लोकतक समाचार न्युज नेटवर्क)

     ⭕ वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर  तालुक्यातील शेलुबाजार सुगरण पक्षी हा  उत्तम घरटी  विणण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तो पक्षी आपल्या परिसरातील  बऱ्याच ठिकाणी  आढळतात व त्यांची  घरटी आपणास पहावयास मिळतात ,ग्रा. येडशी येथे सुगरण पक्षाचे घरटे  बहुसंख्या ठिकाणी आढळून आली आहे, प्रामुख्याने शेतात, रस्त्याच्या कडेला, झाडा-झुडपाला, विहिरीत दिसून येतात. सुगरण पक्षी हा चिमणीच्या आकाराचा एक लहान पक्षी आहे. हा पक्षी उत्तम घरटी विणतो, सुगरण हा पक्षी उत्तम कारागीर आहे  म्हणूनच त्याला सुगरण असे नाव देण्यात आले आहे. घरटी बांधण्याची कला या पक्षाला उपजात प्राप्त झाली आहे, तो आपल्या आणि आपल्या पिल्लांना  निवासासाठी उत्तम प्रकारचे घरटे तयार करीत असतो. घरटी विणण्यासाठी काडी, दोऱ्या, गवत , पाणे,कापूस चिंध्या इत्यादी वस्तूंचा वापर करून उत्तम घरटे विनीत असतो. सुगरण या पक्षाच्या किमान तीन उपजाती आढळून येतात. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि बाया इत्यादी. बाया ही जमात आपल्या परिसरात जास्त प्रमाणात आढळून येते, सुगरण या पक्षाचा मे ते सप्टेंबर हा घरटी विणण्याचा  हंगाम असतो. सुगरण पक्षाच्या घरट्याला खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते, खालून निमुळते आणि लांब बोगदा असतो घरटे गोलाकार होत जाते वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. अशा प्रकारे  सुगरण हा पक्षी उत्तम घरटी विनीत असतो. सुगरण ही मादी एकाच वेळी दोन ते चार अंडी देत असते, अंडी ही पांढऱ्या शुभ्र रंगाचे असते. सुगरण हा पक्षी  आपल्या मेहनतीने घरटी विनीत असते  तरी परिसरातील  सर्वांनी  घरटीचे संवर्धन  करण्याचे आवाहन वन्यजीवप्रेमी राजेश ना. बारड यांच्या संकल्पनेतून  आणि आशिष म. बारड यांच्या लेखणीतून करण्यात आले आहे.

Post a Comment

1 Comments
  1. 👌मनःपूर्वक धन्यवाद भाऊ 👍🇮🇳 संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.