(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
(वाशिम:लोकतक समाचार न्युज नेटवर्क)
⭕वाशिम जिल्ह्यातील प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी www.navodaya.gov.in किंवा www.cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावर भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात.नोंदणीकृत उमेदवारांकरीता ऑनलाईन अर्जामध्ये बदल करण्यासाठी दूरुस्ती खिडकी शेवटच्या तारखेनंतर दोन दिवस उघडण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिंग, प्रवर्ग, क्षेत्र, अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम या क्षेत्रामध्ये दूरुस्ती करता येईल. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.
