⭕ *वाशिम : रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्यांनी मालेगांवची बाजारपेठ सजली...*⭕



(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

⭕ वाशिम/मालेगाव (लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:२८ ऑगस्ट सोमवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भाऊ-बहिणीचा अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन येत्या बुधवारी साजरा होणार आहे यासाठी मालेगांवच्या बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत यामध्ये नवनवीन पद्धतीने बनविलेल्या राख्याची दुकाने सजली आहे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा राख्यांच्या वाढ झालेली असली तरी महिलावर्गाचा राखी खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे जसजसा रक्षाबंधन जवळ येत आहे तस राखी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त राखीचा बाजार सजला आहे राखी खरेदीसाठी महिलांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली रक्षाबंधन सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये समाविष्ट आहे पंचांगानुसार,राखीबंधन हा सण श्रावन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो हा सण भाऊ-बहिणीतील स्नेह आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो राखी बांधताना बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्याच वेळी,भाऊही आपल्या बहिणींना आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देऊन भेटवस्तू देतात बाजारात रंगीबेरंगी राख्यांची विक्री बाजारात राख्यांची दुकाने सजली आहेत सिंथेटिक राखीपासून ते चांदीच्या आणि व इतर राख्याही बाजारात उपलब्ध आहेत सध्या बाजारात पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत जडित राखी,दोरी राखी,लुंबा राखी, Kdis राखी आणि Ti राखी समाविष्ट आहेत या सर्व राख्यांमध्ये तार आणि जडित राख्यांची विक्री वाढत आहे सध्या लोकांच्या मागणीनुसार चांदीची नाणीही उपलब्ध आहेत दुकानात विविध डिझाइनच्या चांदीच्या राख्याही उपलब्ध आहेत चांदीच्या राखीची किंमत किमान सहा ते सातशे रुपयांपर्यंत असते.

Post a Comment

0 Comments