(मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि:अनंता घुगे)
⭕वाशिम/मंगरुळपीर(लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:२८ ऑगस्ट
सोमवार:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी मंगरुळपीर तालुकयातील शेलुबाजार येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच भेट देऊन आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, मंगरुळपीरचे तहसीलदार रवी राठोड, तालुका आरोग्य अधिकारी तथा शेलूबाजारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांचे सह कर्मचारी बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.

