⭕ वाशिम:पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा निमंत्रक कपिल भालेराव तर समन्वयक.:राजेश दबडे...⭕

 



(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड) 

⭕वाशिम/मालेगाव (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि: २२ ऑगस्ट मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील वाशिम येथील खास बातमी  पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वाशिम जिल्हा निमंत्रक पदी शिरपूर जैन येथील पत्रकार कपिल भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा समन्वयक पदी राजेश दबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी त्याची  घोषणा केली आहे.   

  पुढील दोन वर्षांसाठी ही नेमणूक असेल. निमंत्रक आणि समन्वयक यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निमंत्रक आणि समन्वयकांची नावे राज्याकडे पाठवून त्यांची संमती घेऊन नव्या नियुक्तया करावयाच्या आहेत. त्याकरीता कपिल भालेराव व राजेश दबडे लवकरचं जिल्हा तील तालुक्याचा दौरा करणार आहेत कपील भालेराव सध्या दैनिक दिव्य मराठीचे शिरपूर जैन येथील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी नियुक्तीचे श्रेय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य वसंतराव आवचार, तालुका मराठी पत्रकार परिषदेचे सचिव शिवाजी खडसे ,विठ्ठल भागवत, प्रशांत लोखंडे किरण पखाले ,  प्रसाद पाठक , यशवंत हिवराळे, चंद्रकांत गायकवाड ,गोरखनाथ भागवत, दत्ता शिंदे ,सोहेल पठाण अजिंक्य  मेडशिकर शिरपुर शाखा अध्यक्ष गजानन देशमुख, कैलास भालेराव, शशिकांत देशमुख ,गोपाल वाढे,असलम पठाण नवनिजअख्तर ,सेवाराम आडे, दीपक सारडा आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे. या नियुक्तीनंतर बोलताना भालेराव म्हणाले की ,जिल्ह्यात कुठेही पत्रकारावर अन्याय झाला तर त्यासाठी व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल व तसेच राज्यात कुठेही पत्रकारावर अन्याय झाल्यास जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होईल असेते म्हणाले.

Post a Comment

0 Comments