(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
⭕ वाशिम/मालेगाव (लोकतक समाचार) दि:२४ ऑगस्ट गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले विद्यालय रिसोड येथे दि 24/08/2023 ला या ठिकाणी करण्यात आले या मेळाव्याला इयत्ता 8 वी ते 10 वी विद्यार्थ्यांचा सहभाग होता या मेळाव्यामध्ये बाल शिवाजी विद्यानिकेतन व माध्यमिक विद्यालय मालेगाव या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 9 वी ची विद्यार्थिनी कु.महिमा नरेंद्र शर्मा या विद्यार्थिनीची भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्य की आहार भ्रम या विषयावर 6 मिनिटांचा सेमिनार उत्कृष्टरित्या सादर केला त्यामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला विज्ञान शिक्षक वाघ सर यांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये या विद्यार्थिनीची निवड जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी मेळाव्यासाठी झालेली आहे पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या सचिव सौ.रंजनाताई अरविंदराव देशमुख व तिन्ही शाळेच्या मुख्याध्यापकाने भरभरून कौतुक केले तसेच बाल शिवाजी मराठी विद्यानिकेतन मालेगाव मधील इयत्ता 8 वी चा विद्यार्थी दिव्यरत्न देवानंद वैद्य या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये बाजी मारून सुवर्णपदक मिळवले व सोबतच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल संस्थेच्या सचिव सौ.रंजनाताई अरविंदराव देशमुख व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

