(अमळनेर तालुका प्रतिनिधी:उमाकांत ठाकूर)
⭕ जळगाव/नंदुरबार (लोकतक समाचार) दि:२५ ऑगस्ट शुक्रवार:- नंदुरबार जिल्ह्यातील शहादा,तोरणमाळ सह संपुर्ण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळांना जिल्हा पोलीस अधीक्षक कडून कार्यशाळा बद्दल शिबिर घेण्यात येत आहे स्टुडन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम म्युनिसिपल शाळेत विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शस्त्र माहिती व कवायत या विषयांवर तोंडी व प्रात्यक्षिके करून सखोल माहिती देण्यात आली. यामुळे पोलीसचा पी एस आय साहेब युवराज वाणी यांनी विद्यार्थ्यांना सदरील प्रात्यक्षिकेवरून प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर उत्तरे दिलीत तसेच आय पी सी मीना पवार यांनी वाहतुकीचे नियमाविषयी सखोल माहिती दिली ही माहिती अतिशय महत्त्वाची असून तसेच हे नियम पाळले नाही तर व्यक्तीला किंवा वाहन चालकास दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागत असून काही वेळा आपल्या प्राणही गमवावे लागतो या विषयावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांकडून सावधान विश्राम दैने मोड पिछे मूड असे कवायत प्रकार करून घेतलेत दीपक वळवी पिसे यांनी शस्त्र माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतलेत व विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळण्याची संधी उपलब्ध करून दिली. एकंदरीत आजच्या काळात त्या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देणे महत्त्वाचे असून स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रम हा भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. यावेळी मुख्याध्यापक आर पी बसावे तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते पाटील यांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यांमध्ये ही मोहीम राबवले जात आहे.कार्यशाळा आदिवासी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी जनजागृती मोहीम राबवले जात आहे ही मोहीम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील एक इतिहास घडवला जाईल ज्ञान व पुस्तक देण्यात येते आदिवासी विद्यार्थी यांना पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार यांनी योग्य ते मार्गदर्शन करून आपल्यावर कोणत्याही संकट आले 112 ला कॉल करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल चुकीचे माहिती दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी जनजागृती आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आली विद्यार्थी व शिक्षक वर्गाने पोलीस अधिकारी यांना कौतुक करण्यात आले.पोलीस खात्यातही माणुसकी धर्म दिसून येतो...








