(अमळनेर तालुका प्रतिनिधी:उमाकांन्त ठाकुर)
⭕ जळगाव/पाचोरा(लोकतक समाचार) दि:२४ ऑगस्ट गुरुवार:- जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील ख्यैयऱ्या नाल्यात हजारो अंत्योदय योजनांच्या साखर बँगाचे खाली पडलेल्या सुमारे हजारोंच्या खाली पाकिटातील साखर गेली कूठे? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील लासगाव गावाजवळील खैयऱ्या नाल्यात महाराष्ट्र शासन अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांसाठी साखर दिली जाते. याठिकाणी जुलै 23 बँच नं.s 307 साखरेच्या हजारो खाली बँगाचे पाकिटे रस्त्याच्या बाजुला व गावाजवळील खैयऱ्या नाल्यात कोणी टाकल्या आहेत.याच सुमारे हजारोंच्या संख्येने पडलेल्या खाली बँगाचे पाकिटातील साखर गेली कुठे? याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. ह्या ठिकाणी खाली बँगाचे पाकिटे रस्त्याच्या कडेला व नाल्यात कोणी फेकले आहेत याबाबत सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.साखरचे हजारोंच्या खाली बँगाचे पाकिटातील साखर
गरीब गरंजुना न देता रिकाम्या खाली करुन हायवे सह खैऱ्या नाल्यात फेकुन साखरेवर कोनी डलला मारला याची चौकशी होऊन गरीब जनतेस शासनाकडू मिळालेला लाभ कोन खातोय .अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी चौकशी करुन लाभार्थ्यांना नाय द्यावा अशी परीसरातु चर्चा होत आहे. नेमके आता सांगणे शक्य नाही हे पाकीट पाचोरा तालुक्यातील आहे की तालुका बाहेरची आहे हे देखील चौकशी करणे गरजेचे आहे.आणि जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाला पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे


