⭕ *मालेगाव येथील गावाबाहेर असलेले विद्युत कार्यालय गावात सुरू करण्याकरिता नागरिकांचे निवेदन...विद्युत कार्यालय गावाबाहेर गेल्यामुळे विद्युत ग्राहकांना होतोय त्रास...*⭕

 (वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

⭕ वाशिम/मालेगाव (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि: २३ ऑगस्ट बुधवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील उपअभियंता कार्यालय शहरी व ग्रामीण कार्यालय ऑफीस हे गावाच्या बाहेर नेल्याने जनतेस बिल भरणा व दुरुस्ती करीता त्रास होत असल्याने सर दोन्ही कार्यालय हे गावाबाहेर न ठेवता शहराच्या आत (गावात) ठेवणे बाबत.गफारशाह सरदार शाह, (समाज कार्यकर्ते व ईतर MSEB ग्राहक वर्ग यांनी नीवेदन दिले असुन निवेदना मध्ये नमुद केल्या प्रमाणे यापुर्वी MSEB हे कार्यालय गावाच्या मध्यभागी असल्याने जनतेस चांगले होते. आता सदर कार्यालय हे गावाबाहेर नेल्याने मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेस त्रासदायक झाले आहे मालेगांव तालुक्यातील बाहेरगावचे लोक बिल दुरुस्ती व बील भरना करण्या करीता आले असता त्यांना बसस्थानक (तहसिल कार्यालयापासुन) गावाच्या बाहेर अंदाजे 2 ते 3 कि.मी. दूर पायी किंवा स्पेशल अॅटो करुन म्हणजे 50 ते 100 रुपये खर्च करुन बिल भरना व बील दुरुस्ती करीता जावे लागत आहे. काही म्हातारे लोक सुध्दा यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑफीस कोठे आहे याचा त्यांना पत्ता लागत नाही. अँटो भाडे पुरत नाही. व तसेच मालेगांव गावातील ग्राहकांना विज तक्रार करावयाची असल्यास त्यांना सुध्दा गावाबाहेर जावे लागत आहे.सदर कार्यालय गावाबाहेर नेल्याने गाववासीयांना व गावाबाहेरील लोकांना खुप श्रास होत आहे. तरी आपणास नम्र निवेदन करतो कि सदर कार्यालय हे गावामध्ये ठेवण्यात यावे व जनेतस सहकार्य करावे असे निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments