⭕ वाशिम:मालेगाव येथील अखेर मालेगाव पंचायत समितीला मिळाले प्रभारी बीडिओ...(उबाठा)शिवसेनेच्या आंदोलनाला यश...⭕


 (वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

⭕ वाशिम/मालेगाव (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि:२२ आँगस्ट मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील मालेगाव पंचायत समितीचा कारभार गत १७ ते १८ दिवसापासून गट विकास अधिकारी विना चालू होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे कामे खोळंबली होती. या विरोधात शिवसेना (उबाटा) आक्रमक होऊन गट विकास अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून कायमस्वरूपी गट विकास अधिकारी देण्याची मागणी केली होती दोन दिवसात मागणीची पूर्तता न केल्यास पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता याबाबत वृत्तपत्राव्दारे प्रसिद्ध केली होती या "लोकतक समाचार मराठी न्युजपोटॅल" च्या बातमीची दखल घेत कैलासराव घुगे यांची प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी गट विकास अधिकारी मिळाल्याने मालेगाव पंचायत समितीचा कारभार काही प्रमाणात सुरळीत चालून ग्रामीण भागातील जनतेच्या कामाला गती येणार आहे.*

Post a Comment

0 Comments