सोयगाव प्रतिनिधी:-विजय काळे
सोयगाव:- शहरात आज एक चिमुकली पोलीस स्टेशनला आली आणि ठाणे अंमलदार यांना कळविले की सर माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत, ठाणे अंमलदार दौड यांनी एक क्षणही न गमावता रात्री नाकाबंदी केलेले पोलीस अंमलदार गणेश रोकडे यांना फोन वर संपर्क करून माहिती दिली की एक इसम भवानीपुरा येथील राहते घरी येथे आत्महतेचा प्रयत्न करीत आहे तुम्ही लवकर जा असे कळविले वरून पोलीस अंमलदार हे घटनास्थळी पोहचले. सदर इसमाने पोलीस आले ते पाहून घराचे बाल्कनीचे पाईपला बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली तेंव्हा पो अंमलदार रोकडे हे पळत जाऊन त्यांना वरती उचलून पकडलं तेंव्हा आजूबाजूला पाच ते सहा महिला होत्या पण त्यांना काहीच सुचत नव्हतं की काय करावं पोलीस अंमलदार यांनी सांगितलं की माणूस बोलवा दोरी कापावी लागेल तेवढ्यात रिक्षा स्टॅन्ड वर थांबलेली चार पाच पुरुष येऊन त्यांनी मदत केली एकाने दोरी कापली आणि त्या माणसाचा जिव वाचला. सदर इसमास उपचार कामी ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर इसम हा 38 वर्षाचा असून 13 वर्षाच्या चिमुकली ने तिच्या पित्याचे प्राण वाचविले म्हणून पोलीस अंमलदार गणेश रोकडे यास धन्यवाद दिले.
पोलीस अंमलदार गणेश रोकडे याने परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मदत केल्याने एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. सर्व स्तरावर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे व पोलीस अंमलदार गणेश रोकडे याचे धाडसाचे, कार्यतत्पर वृत्तीचे कौतुक होत आहे.
