सिल्लोड:-दि.२५:- सोयगाव प्रबोधनकार विष्णू मापारी यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय महोत्सवात समाजसेवक संजय शहापूरकर यांचा सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रमेश जसवंत हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष आशाबाई तडवी पोलीस निरीक्षक अनमोल केदार व नायब तहसिलदार गोरखनाथ सुरे हे होते
आयोजक विष्णू मापारी यांनी सांगितले की गेल्या २० वर्षापासून पदर मोड करून कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करू बालकांना मोफत औषधी वाटप करीत असल्याने कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे
त्या नंतर मान्यवरांनी संजय शहापूरकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.या प्रसंगी मुख्याध्यापक दादाराव राठोड नगर सेविका संध्याताई मापारी,राजू दुतोंडे दत्ता काटोले अमोल मापारी,केनेकर, परदेसी,यांच्यासह नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.
