सोयगाव ग्रामीण रुग्णालयात "आई महोत्सव" साजरा


.

 सिल्लोड:-दि.२५:- सोयगाव ग्रामीण  रूग्णालय येथे नाट्य पंढरीचे  समाज प्रबोधनकार विष्णूजी मापारी यांनी शहरात सुरुवात केलेल्या."आई महोत्सव" साजरा करण्यात आला. त्यांनी आजारी असलेले पेशंट यांना रुग्णालयात फळ वाटप करून आई महोत्सव साजरा केला. या प्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.कुंदन वाघ,डॉ.स्वप्नील गाढे, डॉ.रवींद्र चव्हाण,पोलीस विभागाचे पोलिस कविता मिस्तरी मॅडम,अजय कोळी,तसेच गट सचिव दिलीप रावणे, सुनील वानखेडे,अतुल मुळे,अतुल गीते, चेतन वाकळकर,विक्रांत  जोहरे,वसंत कारके, इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments