जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.,,,



 सोयगाव:- (प्रतिनिधी)    जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनीं महापुरुष व महानस्ञीयांच्या वेशभुषा परीधान करून तर कु. भूमी शरद पवार ह्या विद्यार्थीनीने भारत मातेचा वेशभुषा परीधान केली होती.सकाळी काळे नगर,रामजीनगर परीसरात प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.नंतर मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व विद्यार्थी गणेश सोनवणे यांच्या मागे ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी यांनी संविधान उद्देश पञिकेचे सामुहीक वाचन केले.त्यानंंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून शाळेतील सहशिक्षक आसिफ देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांवर   आपले नृत्यकला सादर केली.याच बरोबर माता पालक संघ साठी आयोजित अनेक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या मातांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी नगरसेवक गजानन कुडके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ इंगळे,उपाध्यक्ष मनिषा जेठे,सदस्य योगेश बोखारे ,शरद पवार,ज्ञानेश्वर सोनवणे,सुनिता जोहरे,विठ्ठल इंगळे,वैशाली पवार,छाया सोनवणे,कविता सोनवणे,प्रविण जाधव,नम्रता जाधव,सोनम सोनवणे,रत्ना लाठे,दत्ताञय जोहरे,शंकर जेठे,राजेंद्र इंगळे,सुकलाल बावस्कर यांच्या सह ग्रामस्थ,पालक,माजी विद्यार्थ्यां,विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments