जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलितयांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा भारतीय प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा,,,

 


 सिल्लोड:- सोयगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व लेट एलबीके पाटील इंग्लिश प्राइमरी स्कूल सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ वा भारतीय प्रजासत्ताक आज मोठ्या उत्साहात वानंदात साजरा करण्यात आला उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नारायण रायभान कोलते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला यावर्षी अमृत महोत्सवाची सुरुवात असल्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.के.जी. टू पीजी सर्व विद्यार्थ्यांनी भाषण गायन एकांकिका नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांना वाव दिला. यावेळेस प्राचार्य कोलते यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व विद्यार्थ्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या स्वतंत्र सैनिकांचे महत्त्व सांगितले तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो. व याला गणतंत्र दिवस का म्हणतात याबद्दल मार्गदर्शन केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांना अभिवादन होईल यावेळेस संस्थेतील सर्व शिक्षक व प्राध्यापक व शिक्षकतेर बंधू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments